तो अनमेले पर्वत
त्यावर सागवनाची लागवड
खर तर शक्य नाही
पण वुडस ने ते काम स्वीकारले
आदिवासींच्या झोपड्याही जवळच
आणि हा तर संशोधक
औषधांचा आणि खातांचा शोध लावणारा
आणि सोबत आदिवासी ह्याला पुरेपूर मदत करायला
एक दिवस एका जखमी भेकराला घेऊन
एक आदिवासी तरुणी त्याच्याकडे आली
नाव " अरणी "
भेकर चांगल झाल
आणि अरणी आणि वुडस
यांच्या वाढायला लागल्या गाठीभेटी
एक नाजूक प्रीतीचा भावबंध
झाला अचानक निर्माण
एकमेकांच्या मदतीने
दोघांनी अनेक काम केली
अगदी सागवनाची लागवड सुद्धा
आणि एक दिवस
वुडस च्या जीवनात
अचानक आलेली अरणी
पुन्हा गेली जंगलात निघून
कधीच न पारतण्यासाठी
चैताली
कथा --- अरणी
लेखक --- मारुती चितमपल्ली.
( जाने. २००६ च्या अ. मा. मराठी साहित्य समेलनाचे अध्यक्ष )