Monday, March 17, 2008

कथेवरून कविता...

मला शाळेचा रस्ता खूप आवडतो
पण आज सार काही वेगळमाझ्या झाडांना कोणी पाणी घातल
नव्हात 3 दिवस,
आई रडताना दिसली
बाबा सुद्धा कधी नाही तो
घरात .....म्हणजेच ओसरीवर बसलेला...
तो ही रडत
आणि मी मजेत निघालेली
शाळेत
आज माझा बाक रिकामाच होता
मी जाऊन बसले
बाइनी हजेरी सुरू केली
मला मझ नाव हजेरीच्या पुस्तकात वाचायला
खूप आवडायाच
माझ नावच आज घेतल नाही
म्हणून मी हजेरीच्या पुस्तकात बघायला गेले
तर माझ्या नावापुढे काय लिहिल होत माहीत आहे
" न्यूमोनियाने वारली ".


...चैताली...

( रत्नाकर मतकरींच्या " झपाटलेल्या गोष्टी " या पुस्तकातल्या" शाळेचा रस्ता " या कथेच कवितेत केलेल हे रुपांतर. )

No comments: